हिंदुस्तान टाइम्स हे भारतातील (विशेषतः उत्तर भारतातील) एक प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र आहे. हिंदुस्तान टाइम्स एकाचवेळी नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा, रांची, लखनौ, भोपाळ व चंदिगढ ह्या शहरांमधुन प्रकाशित होतो. १९२४ साली भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या दरम्यान ह्या वृत्तपत्राची स्थापना झाली[१][२].
इतिहास
हिंदुस्तान टाईम्सची स्थापना १९२४ मध्ये पंजाब प्रांतातील अकाली चळवळ व शिरोमणी अकाली दलाचे संस्थापक-पिता सुंदरसिंग लयलपुरी यांनी केली होती[३]. महात्मा गांधी यांचे पुत्र देवदास गांधी यांना संपादक समितीमध्ये स्थान देण्यात आले होते आणि नंतर ते संपादक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. उद्घाटन सोहळा महात्मा गांधींनी २६ सप्टेंबर १९२४ रोजी सादर केला[४].
मालकी
दिल्लीस्थित हिंदुस्तान टाईम्स हा केके बिर्ला समूहाचा एक भाग आहे आणि काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेची सदस्य आणि उद्योगपती कृष्णाकुमार बिर्ला यांची मुलगी आणि घनश्याम दास बिर्ला यांची नात शोभना भारतिया यांचे व्यवस्थापन आहे.