किन्शासा (मागील नाव फ्रेंच: Léopoldville) ही आफ्रिकेतील काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या पश्चिम भागात काँगो नदीच्या काठावर वसले आहे. नदीपलीकडे काँगोचे प्रजासत्ताक देशाची राजधानी ब्राझाव्हिल स्थित आहे. सुमारे ९४ लाख महानगरी लोकसंख्या असलेले किन्शासा हे पॅरिस खालोखाल जगातील दुसरे मोठे फ्रेंच भाषिक शहर तर लागोस व कैरो खालोखाल आफ्रिकेमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
किन्शासाची स्थापना इ.स. १८८१ मध्ये झाली व तत्कालीन बेल्जियन राजा दुसरा लिओपोल्ड ह्याच्या नावावरून लिओपोल्डव्हिल असे ह्या शहराचे नाव ठेवण्यात आले. इ.स. १९२० साली लिओपोल्डव्हिल बेल्जियन काँगो वसाहतीची राजधानी बनली. स्वातंत्र्यानंतर १९६५ साली सत्तेवर आलेल्या मोबुटु सेसे सेको ह्याने ह्या शहराचे नाव बदलून किन्शासा असे ठेवले.
मोबुटुच्या कारकिर्दीदरम्यान अनेक कारणांस्तव ऱ्हास झालेले किन्शासा सध्या देखील आफ्रिकेमधील प्रमुख शहर मानले जाते.
बाह्य दुवे
आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे |
---|
| |