न्यू झीलंड क्रिकेट संघ सध्या सप्टेंबरमध्ये कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करत आहे आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये पुन्हा एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी दौरा करणार आहे.[ १] [ २] या दौऱ्यात दोन कसोटी , तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[ ३] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे.[ ४] [ ५] नोव्हेंबर २०२३ मध्ये, श्रीलंका क्रिकेटने (SLC) २०२४ साठी त्यांचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर जाहीर केले आणि द्विपक्षीय मालिकेची पुष्टी केली.[ ६] न्यू झीलंडने याआधी २०१९ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता.
२३ ऑगस्ट २०२४ रोजी, श्रीलंका क्रिकेटने घोषणा केली की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे, २१ सप्टेंबरला विश्रांतीचा दिवस ठेवून पहिली कसोटी सहा दिवस खेळली जाईल.[ ७]
दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ५ बाद ६०२ धावा ही त्यांची न्यू झीलंडविरुद्धची पहिली ५०० पेक्षा अधिक धावसंख्या होती. त्या कामगिरीसह श्रीलंकेचा संघ नऊ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ६०० पेक्षा अधिक धावा करणारा कसोटी क्रिकेटमधील पहिला संघ बनला.[ ८]
संघ
दुसऱ्या कसोटीच्या आधी, पायाला दुखापत झालेल्या विश्व फर्नांडोच्या जागी श्रीलंकेने निशान पेरीसला स्थान दिले.[ १५]
कसोटी मालिका
१ली कसोटी
नाणेफेक: श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी २१ सप्टेंबर रोजी विश्रांतीचा दिवस होता.[ ७]
विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: श्रीलंका १२, न्यू झीलंड ०.
२री कसोटी
नाणेफेक: श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
निशान पेरीसने श्रीलंकेकडून कसोटी पदार्पण केले.
श्रीलंकेच्या कमिंदु मेंडिसने कसोटीत १,००० धावा पूर्ण केल्या आणि डावांच्या संख्येनुसार तिथे पोहोचणारा संयुक्त-तिसरा वेगवान फलंदाज ठरला (१३ डाव).[ १६] [ १७]
श्रीलंकेच्या निशान पेरीसने कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[ १८]
विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: श्रीलंका १२, न्यू झीलंड ०.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला आं.टी२० सामना
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
मिचेल हेने न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
कुसल परेरा तिलकरत्ने दिलशानला मागे टाकत श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.[ १९]
२रा आं.टी२० सामना
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) ने हॅटट्रिक घेतली.[ २०]
मिचेल हे (न्यूझीलंड) याने एका आंतरराष्ट्रीय टी२० डावात यष्टिरक्षकाद्वारे सर्वाधिक गडी बाद (६) करण्याचा विक्रम मोडला.[ २१]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला आं.ए.दि. सामना
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे श्रीलंकेचा डाव ४९.२ षटकांत आटोपला.
पावसामुळे न्यूझीलंडला २७ षटकांत २२१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
मिचेल हे , टिम रॉबिन्सन आणि नेथन स्मिथ (न्यूझीलंड) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.
२रा आं.ए.दि. सामना
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
पावसामुळे सामना ४७ षटकांचा करण्यात आला.
२०१२ नंतर न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेचा हा पहिला वनडे मालिका विजय होता.[ २२]
३रा आं.ए.दि. सामना
१९ नोव्हेंबर २०२४
१४:३० (
दि/रा )
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
चमिंदु विक्रमसिंघे (श्रीलंका) आणि झॅक फॉल्केस (न्यूझीलंड) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.
सलग सहा मालिका जिंकून श्रीलंकेने मायदेशात खेळल्या गेलेल्या द्विपक्षीय मालिकेतील वनडेत सर्वाधिक प्रदीर्घ विजयाची नोंद केली.[ २३]
संदर्भयादी
^ "New Zealand Tour of Sri Lanka 2024" [न्यू झीलंडचा श्रीलंका दौरा २०२४]. श्रीलंका क्रिकेट . २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "कर्णधार साऊथी उपखंडातील आगामी सर्व कसोटी सामने खेळू शकणार नाही" . ईएसपीएन क्रिकइन्फो . २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Men's Future Tours Programme" [पुरुषांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम] (PDF) . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "New Zealand reveal strong squad for Afghanistan, Sri Lanka Tests" [अफगाणिस्तान, श्रीलंका कसोटीसाठी न्यूझीलंडचा मजबूत संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "NZ pick William O'Rourke, Ben Sears for Afghanistan, Sri Lanka Tests" [न्यूझीलंड संघात अफगाणिस्तान, श्रीलंका कसोटीसाठी विल्यम ओ'रुर्के, बेन सियर्सची निवड]. क्रिकबझ्झ . २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Men's 2024 Future Tours Program of Sri Lanka Cricket" [श्रीलंका क्रिकेटचा पुरुषांच्या २०२४ साठी भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम]. श्रीलंका क्रिकेट . २९ नोव्हेंबर २०२३. २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ a b "Rest day returns as Sri Lanka announce schedule for New Zealand Test series" [श्रीलंकेतर्फे न्यूझीलंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर, विश्रांतीचा दिवस परतला]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Stats - SL's best year in Tests since 2006" [आकडेवारी - श्रीलंकेचे २००६ नंतरचे कसोटीतील सर्वोत्तम वर्ष]. ईएसपीएन क्रिकइन्फो . ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Batter makes comeback after one-year gap as Sri Lanka announce Test squad for New Zealand series" [श्रीलंकेचा न्यूझीलंड मालिकेसाठी कसोटी संघ जाहीर, फलंदाजांचे एक वर्षाच्या अंतरानंतर पुनरागमन.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Kusal Perera, Mohamed Shiraz return for New Zealand ODIs" [कुशल परेरा, मोहम्मद शिराझचे न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी पुनरागमन.]. ईएसपीएन क्रिकइन्फो . १० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Sri Lanka T20I and ODI Squads for the New Zealand Series" [न्यूझीलंड मालिकेसाठी श्रीलंकेचा आं.टी२० आणि आं.ए.दि. संघ]. Sri Lanka Cricket . १० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Sears & O'Rourke set for Afghanistan & Sri Lanka Tests | Bracewell returns" [अफगाणिस्तान आणि श्रीलंका कसोटीसाठी सीयर्स आणि ओ’रुर्क सज्ज | ब्रेसवेलचे पुनरागमन]. न्यूझीलंड क्रिकेट . 2024-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Smith & Hay earn maiden call-ups | Santner to lead against Sri Lanka" [स्मिथ आणि हे यांना श्रीलंकेविरुद्ध प्रतिनिधित्व करण्यासाठी पहिल्यांदाच बोलावणे | सँटनर नेतृत्व करणार]. न्यू झीलंड क्रिकेट . 2024-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Santner to lead New Zealand in SL T20Is, ODIs" [सँटनर श्रीलंका आं.टी२०, आं.ए.दि.मध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व करणार]. क्रिकबझ्झ . ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Sri Lanka call up uncapped offspinner Nishan Peiris for second New Zealand Test" [श्रीलंकेने न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटीसाठी नवोदित ऑफस्पिनर निशान पेरीसला बोलावले]. ईएसपीएन क्रिकइन्फो . ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Kamindu Mendis becomes joint-third fastest to 1000 Test runs, goes level with Don Bradman" [डॉन ब्रॅडमनच्या बरोबरीने कमिंदु मेंडिस बनला सर्वात जलद १००० कसोटी धावा करणारा संयुक्त तिसरा फलंदाज]. स्पोर्टस्टार . ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Quickest since 1949! Kamindu Mendis equals legendary Don Bradman with new record" [१९४९ नंतरचे सर्वात जलद! कमिंदु मेंडिसचा दिग्गज डॉन ब्रॅडमनची बरोबरी करत नवीन विक्रम]. द टाइम्स ऑफ इंडिया . ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Peiris five-for puts Sri Lanka in sight of series sweep" [पेरिसच्या पाच बळींमुळे निर्भेळ मालिके विजय श्रीलंकेच्या दृष्टीक्षेपात]. ईएसपीएन क्रिकइन्फो . ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "कुसल परेराने तिलकरत्ने दिलशानचा सर्वकालीन विक्रम मोडला, श्रीलंकेने केला पहिल्या आं.टी२० मध्ये न्यूझीलंडचा पराभव" . इंडिया टीव्ही (इंग्रजी भाषेत). ९ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "हॅट्ट्रिक घेऊन लॉकी फर्ग्युसन न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या एलिट यादीत सामील" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद . १० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "न्यूझीलंडच्या मिचेल हेने डंबुलामध्ये सर्वकालीन विकेटकीपिंगचा विक्रम केला" . क्रिकेट.कॉम . १० नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Kusal Mendis, spinners seal series win for Sri Lanka" [कुशल मेंडिस, फिरकीपटूंकडून श्रीलंकेच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब]. ईएसपीएन क्रिकइन्फो . १७ नोव्हेंबर २०२४. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Kusal Mendis stars as Sri Lanka clinch New Zealand ODI series" . अडा डेराना (इंग्रजी भाषेत). 17 November 2024. 19 November 2024 रोजी पाहिले .
बाह्यदुवे
सप्टेंबर २०२४ ऑक्टोबर २०२४ नोव्हेंबर २०२४ डिसेंबर २०२४ जानेवारी २०२५ फेब्रुवारी २०२५ मार्च २०२५ चालू मालिका
श्रीलंकेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरे
कसोटी आणि मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय दौरे
अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड भारत आयर्लंड न्यू झीलंड पाकिस्तान दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीज झिम्बाब्वे
स्पर्धा आयोजित केल्या
अनेक संघ
इतर दौरे
अफगाण ऑस्ट्रेलियन बांगलादेशी कॅनेडियन इंग्लिश भारतीय केनिया मलेशियन बहुराष्ट्रीय न्यू झीलंड पाकिस्तानी स्कॉटिश वेस्ट इंडीज आयरिश दक्षिण आफ्रिका अ