दिमुथ करुणारत्नेला दुखापत झाल्याने पहिला कसोटीत श्रीलंकेचे कर्णधारपद दिनेश चंदिमलकडे देण्यात आले. ज्यो रूटच्या उत्तम अश्या २२८ धावांच्या खेळीमुळे पहिल्या कसोटीत इंग्लंडने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. ज्यो रूटची २२८ ही खेळी इंग्लंडच्या फलंदाजाने श्रीलंकेत केलेल्या सर्वोच्च धावा होत्या. दुसऱ्या कसोटीसाठीसुद्धा करुणारत्ने बरा नाही होऊ शकल्याने दिनेश चंदिमललाच कर्णधार नेमण्यात आले. इंग्लंडने दुसरी कसोटी देखील ६ गडी राखत जिंकली आणि कसोटी मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला. इंग्लंडने सलग पाचव्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकली, तर ह्या सलग ज्या पाच मालिका जिंकल्या त्या १९१३-१४ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतरचा सर्वोत्तम विजयी मालिका आहेत.