गट फेरीतील ५वा सामना जो की नेदरलँड्स आणि मलेशिया मध्ये खेळवला गेला होता तो सामना पावसामुळे बरोबरीत सुटला. निर्धारीत वेळ निघून गेल्यामुळे सुपर ओव्हर खेळवता आली नाही. परिणामी नेपाळ आणि नेदरलँड्स हे दोन देश गट फेरीत अव्वल दोन स्थानांवर राहिल्याने अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. २४ एप्रिल २०२१ रोजी खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान नेपाळने नेदरलँड्सचा १४२ धावांनी दणदणीत पराभव करत त्रिकोणी मालिका जिंकली. नेपाळच्या कुशल भुर्टेलला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याने सर्व सामन्यांमधील मिळून स्पर्धेतील सर्वाधिक २७८ धावा केल्या.
गुणफलक
प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी दोन-दोन सामने खेळले. गट फेरीच्या शेवटी गुणफलकातील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यात जेतेपदासाठी खेळले.