आयर्लंड क्रिकेट संघाने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जानेवारी २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. संयुक्त अरब अमिरातीसोबत एकदिवसीय मालिका खेळून झाल्यावर आयर्लंड ने अफगाणिस्तानविरुद्ध तीन वनडे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्येच खेळले. सर्व सामने अबु धाबीतील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीचे नेतृत्व अहमद रझा याने केले तर अँड्रु बल्बिर्नी याला आयर्लंडचा कर्णधार नियुक्त केले गेले.
पहिला एकदिवसीय सामना हा अनपेक्षितपणे संयुक्त अरब अमिरातीने जिंकला. पण युएईच्या काही खेळाडूंना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना रद्द करावा लागला. चौथा सामना नियोनानुसार पार पाडला. आयर्लंडने चौथा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ११२ धावांनी जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत राखली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
काशीफ दाउद आणि आलिशान शराफु (सं.अ.अ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
नाणेफेक : नाणेफेक नाही.
संयुक्त अरब अमिरातीचे काही खेळाडूंना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने सामना रद्द.
३रा सामना
नाणेफेक : नाणेफेक नाही.
संयुक्त अरब अमिरातीचे काही खेळाडूंना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने सामना रद्द.
४था सामना
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे संयुक्त अरब अमिराती दौरे
संपुर्ण सदस्यांचे दौरे
संपुर्ण सदस्यांच्या स्पर्धा
अनेक संघ असोसिएट सदस्यांचे दौरे
असोसिएट सदस्यांच्या स्पर्धा
सप्टेंबर २०२० ऑक्टोबर २०२० डिसेंबर २०२० जानेवारी २०२१ फेब्रुवारी २०२१ मार्च २०२१ एप्रिल २०२१ चालु स्पर्धा