झिम्बाब्वे क्रिकेट संघाने १-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जून आणि जुलै २०१७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला.[१][२][३] सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार होते.[४][५][६] जानेवारी २००२ नंतर हा झिम्बाब्वेचा पहिलाच श्रीलंका दौरा होता. दौऱ्यावरील सर्व सामने दिवसा खेळवले गेले.[७]
झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिका ३–२ अशी जिंकली.[८] हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध पहिलाच मालिकाविजय.[९] २००९ च्या केन्या दौऱ्यातील विजयानंतर हा त्यांचा परदेशातील पहिलाच विजय[१०] तसेच हा त्यांचा २००१ मधील बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्ध परदेशातील पहिलाच मालिका विजय.[११] त्याशिवाय झिम्बाब्वेचा हा पाच सामन्यांच्या मालिकेत परदेशातील पहिलाच विजय.[१२] झिम्बाब्वेच्या कर्णधार, ग्रेम क्रिमरने, हा विजय "माझ्या कारकिर्दीचा कळस" असल्याची भावना व्यक्त केली.[१३] त्या विरुद्ध, श्रीलंकेचा कर्णधार, ॲंजेलो मॅथ्यूज, म्हणाला हा पराभव "माझ्या कारकिर्दीतील सर्वात खालचे टोक आहे "[१४] आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व तीनही प्रकारांतून कर्णधारपदाचा राजीनामा दिला.[१५] दिनेश चंदिमलची त्यानंतर नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.[१६]
श्रीलंकेने एकमेव कसोटीमध्ये ४ गडी राखून विजय मिळवला.[१७]
संघ
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
- नाणेफेक : श्रीलंका फलंदाजी.
- कुशल मेंडिसच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वात जलद १,००० धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी.[२४]
- सोलोमन मायरचे (झि) पहिले एकदिवसीय शतक.[२४]
- हा झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेमध्ये पहिलाच विजय.[२४]
- श्रीलंकेमधील एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग तसेच ३०० पेक्षा जास्तधावांचा पहिलाच यशस्वी पाठलाग.[२५]
२रा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: वनिदु हसरंगा (श्री).
- वनिदु हसरंगा (श्री) हा एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात हॅट्ट्रीक घेणारा जगातील सर्वात लहान तर श्रीलंकेचा पहिलाच गोलंदाज.[२६]
३रा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- निरोशन डिक्वेल्ला आणि दनुष्का गुणतिलक (श्री) ह्या दोघांचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.[२७]
- घरच्या मैदानावरील एकदिवसीय सामन्यातील हा श्रीलंकेचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[२८]
४था एकदिवसीय सामना
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- झिम्बाब्वेच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर ३१ षटकांमध्ये २१९ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- असित फर्नांडो (श्री) एकदिवसीय पदार्पण.
- निरोशन डिक्वेल्ला आणि दनुष्का गुणतिलक (श्री) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये लागोपाठ दोन सामन्यांमध्ये द्विशतकी भागीदारी केली. असे करणारे ती पहिलीच जोडी ठरली.[२९]
५वा एकदिवसीय सामना
- नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी.
- हा झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुद्ध पहिलाच मालिकाविजय.[१२]
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: तरीसाई मुसाकांडा (झि)
- दिनेश चंदिमलचा श्रीलंकेचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना.[३०]
- झिम्बाब्वेच्या पहिल्या दिवशीच्या ३४४ धावा ह्या त्यांनी कसोटीच्या एका दिवशी केलेल्या सर्वात जास्त धावा आहेत.[३१]
- रंगना हेराथ (श्री) हा कसोटी डावात ५ बळी ३० वेळा घेणारा पाचवा गोलंदाज.[३२]
- पहिल्यांदाच पाच बळी घेणारा ग्रेम क्रिमर (झि), हा झिम्बाब्वेचा पहिलाच कर्णधार.[३३]
- सिकंदर रझाचे (झि) पहिले कसोटी शतक.[३४]
- श्रीलंकेचा कसोटीमधील तसेच आशियातील कसोटीमध्ये कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[३५]
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
|
---|
|
मे २०१७ | |
---|
जून २०१७ | |
---|
जुलै २०१७ | |
---|
ऑगस्ट २०१७ | |
---|
सप्टेंबर २०१७ | |
---|
सध्या सुरु असलेल्या स्पर्धा | |
---|
|