ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[१] २०११ नंतर हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच बांगलादेश दौरा होता.[२] बांगलादेशने पहिल्या कसोटीत २० धावांनी विजय मिळवला, हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच कसोटी विजय.[३] या विजयानंतर बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहिम म्हणाला की, "ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करणे हा एक खूप चांगला अनुभव आहे, आणि मला वाटते की सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला".[४] ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला, "मला वाटते की, खासकरून घरच्या मैदानावर त्यांचा संघ धोकादायक आहे".[५] ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना ७ गडी राखून जिंकला, त्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत सुटली.[६]
ऑस्ट्रेलियाचा मूलतः सप्टेंबर २०१५ मध्ये बांगलादेशचा दौरा प्रस्तावित होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव तो रद्द करण्यात आला.[७][८] ऑक्टोबर २०१६ मधील इंग्लंडच्या बांगलादेश दौऱ्यानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलॅंड म्हणाले ऑस्ट्रेलियाची बांगलादेशमध्ये खेळण्याची शक्यता "खूप जास्त" आहे.[९] एप्रिल 2२०१७ मध्ये, दोघे सीए आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) या दौऱ्यासाठीच्या सामन्यांसंदर्भात चर्चा करत होते.[१०] बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निजामुद्दीन चौधरी, म्हणाले की ते आता "क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत वेळापत्रक आणि अन्य तपशीलांवर काम करीत आहेत".[११] मे २०१७ मध्ये सुरक्षेबाबत तपासणी झाली.[२] त्यानंतर त्याच महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बांगलादेश दौऱ्याची व्यवस्था निश्चित करण्यासाठी एक सुरक्षा दल पाठवले.[१२]
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन (एसीए) यांच्या प्रतिनिधींनी नियोजित दौऱ्याआधी २४ जुलै २०१७ रोजी सुरक्षितता दौरा केला."बांगलादेश दौऱ्याच्या अपेक्षा अजूनही जास्त". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.</ref> तथापि, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू, सीए आणि एसीए यांच्यातील वेतन विवाद आणि बीसीबीला दौरा होण्याची शक्यता असल्याची माहिती याबाबत प्रगती होत नव्हती.[१३] त्याआधी जुलैमध्ये, ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघाने वादग्रस्त कारणाने दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणीय मालिका स्पर्धेतून बाहेर काढले होते.[१४] ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने म्हणले आहे की, मालिका सुरू होण्यापूर्वी डार्विनमधील प्रशिक्षण शिबिरaमध्ये ते उपस्थित राहणार आहेत, परंतु वेतनाबाबतचा वाद संपल्याशिवाय ते बांगलादेशला जाणार नाहीत.[१५] १ ऑगस्ट २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला की वेतनवाढीच्या प्रगती होत आहे, पण त्याला दौरा सुरू होण्याआधी अंतिम स्वरूप देणे आवश्यक आहे.[१६] दुसऱ्याच दिवशी, वेतन-विवादावर तोडगा निघाल्याने, कसोटी मालिका ठरल्याप्रमाणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.[१७][१८] १८ ऑगस्ट २०१७ रोजी कडेकोट सुरक्षेमध्ये ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेशमध्ये पोहोचला.[१९]
दौरा सुरू होण्याआधी, एका सराव सामन्याचे ठीकाण खान शाहब उस्मान अली मैदानावर पाणी साचले होते.[२०] मैदान वेळेत तयार नसल्यास बीसीबीने दोन वैकल्पिक स्थळांवर सामना खेळवण्याची तयारी केली होती.[२०] परंतू, सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी, पाणी साचल्याने सामना रद्द करण्या आला.[२१]