पुरुष एकेरी तिरंदाजी हा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ४ तिरंदाजी प्रकारांपैकी एक होता.
स्पर्धा स्वरुप
तिरंदाजीतील इतर प्रकारांप्रमाणे, पुरुष एकेरी रिकर्व्ह प्रकारसुद्धा विश्व तिरंदाजी मान्य ७० मी अंतर आणि नियमांच्या अंतर्गत आयोजित केला गेला. ६४ तिरंदाज स्पर्धेत सहभागी झाले आणि स्पर्धेची सुरुवात रँकिंग फेरीने झाली, ज्यामध्ये प्रत्येक तिरंदाजाने ७२ वेळा बाण मारला. क्रमवारी फेरीतील क्रमांकांचा वापर सिंगल-एलिमिनेशन ब्रॅकेटसाठी केला गेला. बाद सामन्यांमध्ये २०१२ मध्ये अंमलात आणलेली संच पद्धत वापरली गेली. प्रत्येक सामन्यात प्रत्येकी ३ बाणांच्या ५ संचांचा समावेश होता. प्रत्येक संचातील विजयासाठी २ गुण दिले गेले आणि बरोबरी झाल्यास प्रत्येकी १ गुण दिला गेला. ५ संचांच्या शेवटी जर गुण संख्या ५-५ अशी असेल तर, प्रत्येकी १ बाण मारून, ज्याचा बाण मध्यबिंदुच्या जास्तीत जास्त जवळ असेल त्या तिरंदाजाला विजयी घोषित करण्यात येईल.[१]
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी−३).
दिवस |
दिनांक |
सुरुवात |
समाप्त |
प्रकार |
टप्पा
|
दिवस ० |
शुक्रवार ५ ऑगस्ट २०१६ |
०९:०० |
|
पुरुष एकेरी |
क्रमवारी फेरी
|
दिवस ३ |
सोमवार ८ ऑगस्ट २०१६ |
०९:०० |
१७:४५ |
पुरुष एकेरी |
१/३२ व १/१६ एलिमिनेशन
|
दिवस ४ |
मंगळवार ९ ऑगस्ट २०१६ |
०९:०० |
१७:४५ |
पुरुष एकेरी |
१/३२ व १/१६ एलिमिनेशन
|
दिवस ५ |
बुधवार १० ऑगस्ट २०१६ |
०९:०० |
१८:५५ |
पुरुष एकेरी |
१/३२ व १/१६ एलिमिनेशन
|
दिवस ७ |
गुरुवार १२ ऑगस्ट २०१६ |
०९:०० |
१७:१० |
पुरुष एकेरी |
१/८ एलिमिनेशन/उपांत्यपूर्व/उपांत्य/पदक फेरी
|
विक्रम
स्पर्धेआधी विश्वविक्रम आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे होते. दक्षिण कोरियाच्या किम वू-जिनने दोन्ही विक्रम मोडले.
निकाल
क्रमवारी फेरी
- WR: विश्व विक्रम
- OR: ऑलिंपिक विक्रम
स्पर्धा ब्रॅकेट
अंतिम
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
हे सुद्धा पहा
संदर्भ