पुरुष सांघिक तिरंदाजी हा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ४ तिरंदाजी प्रकारांपैकी एक होता.
स्पर्धा स्वरूप
तिरंदाजीतील इतर प्रकारांप्रमाणे, पुरुष सांघिक रिकर्व्ह प्रकारसुद्धा विश्व तिरंदाजी मान्य ७० मी अंतर आणि नियमांच्या अंतर्गत आयोजित केला गेला.
प्रत्येकी ३ तिरंदाजांचे एकूण १२ संघ सहभागी झाले. स्पर्धेची सुरुवात रँकिंग फेरीने झाली, ज्यामध्ये प्रत्येक तिरंदाजाने ७२ वेळा बाण मारला (ही तोच क्रमवारी फेरी होती जी एकेरी प्रकारासाठी वापरली गेली). ह्या फेरीतील एकत्रित गुणसंख्या संघांच्या क्रमवारीसाठी एकमेव-एलिमिनेशन फेरीसाठी वापरली गेली, ज्यामधील सर्वोत्कृष्ट ४ संघाना थेट उपांत्यपूर्व फेरी मध्ये प्रवेश मिळाला. प्रत्येकस सामन्यामध्ये प्रत्येक तिरंदाजासाठी २ याप्रमाणे ६ बाणांचे ४ संच होते. प्रत्येक संचामध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या संघाला २ गुण दिले गेले; बरोबरी झाल्यास १ गुण दिला गेला. सर्वप्रथम ५ गुण मिळवणारा संघ विजय घोषित केला गेला.[१]
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळ ( यूटीसी−३) आहेत.
दिवस |
दिनांक |
सुरुवात |
समाप्त |
प्रकार |
टप्पा
|
दिवस १ |
शनिवार शनिवार ६ ऑगस्ट २०१६ |
९:०० |
१७:४५ |
पुरुष संघ |
एलिमिनेशन/मेडल फेरी
|
विक्रम
स्पर्धेच्या आधी, विश्व आणि ऑलिंपिकमधील तिरंदाजी विक्रम खालीलप्रमाणे. क्रमवारी फेरीतील विक्रम २०१२ च्या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी मोडला होता.
निकाल
स्रोत: [२]
क्रमवारी फेरी
स्पर्धा
- तिरके क्रमांक संचाची गुणसंख्या दर्शवतात.
हे सुद्धा पहा
संदर्भ