२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष फुटबॉल स्पर्धा ४-२० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[२] उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही २६वी आवृत्ती आहे. महिला स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल.[३] पुरुष गटामध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये २३ वर्षांखालील खेळाडूंनाच (१ जानेवारी १९९३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या) खेळण्याची परवानगी आहे. प्रत्येक संघात फक्त तीनच २३ वर्षांवरील खेळाडूंना सहभागी होता येईल.
पुरुष स्पर्धेचे सामना वेळापत्रक १० नोव्हेंबर २००५ रोजी जाहीर करण्यात आले.[५][६]
ग
गट फेरी
¼
उपांत्य पुर्व
½
उपांत्य
ति
३ऱ्या स्थानासाठी सामना
अं
अंतिम
खेळ↓/दिनांक→
बुध ३
गुरू ४
शुक्र ५
शनि ६
रवि ७
सोम ८
मंगळ ९
बुध १०
गुरू ११
शुक्र १२
शनि १३
रवि १४
सोम १५
मंगळ १६
बुध १७
गुरू १८
शुक्र १९
शनि २०
पुरुष
ग
ग
ग
¼
½
ति
अं
पात्रता
यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील १५ देशांचे पुरुष संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[७]
स्पर्धेचा ड्रॉ १४ एप्रिल २०१६ रोजी, ब्राझील प्रमाणवेळेनुसार (यूटीसी-३) १०:३० वाजता माराकान्या, रियो दी जानेरो येथे काढला गेला.[१४] पुरुष स्पर्धेमध्ये १६ संघ प्रत्येकी ४ संघांच्या ४ गटांमध्ये विभागण्यात आले.[१५]
संघांना त्यांच्या याआधीच्या पाच ऑलिंपिक कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आले (सर्वात अलिकडील स्पर्धेला जास्त महत्त्व देऊन). त्याशिवाय सहा पात्र चॅम्पियन संघांना बोनस गुण देण्यात आला (जपान, नायजेरिया, मेक्सिको, अर्जेंटिना, फिजी, स्वीडन).[१६] यजमान ब्राझीलला आपोआपच अ१ स्थान दिले गेले. एकाच गटात एका संघराज्यातील जास्तीत जास्त एकाच संघाचा समावेश केला गेला.[१७]