अहमदनगर हे अहमदनगर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या दौंड-मनमाड मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. अहमदनगर-बीड-परळी ह्या रेल्वेमार्गाचे बांधकाम चालू असून हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नगर स्थानकाचे महत्त्व अजून वाढेल असा अंदाज आहे.