घाटकोपर हे मुंबई शहराच्या घाटकोपर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून ते मुंबई महानगरामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
मुंबई मेट्रोचा मार्ग १ घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावतो. घाटकोपर मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाच्या जवळच असून दोन्ही स्थानके पादचारी पुलाद्वारे जोडली गेली आहेत.