दिवा जंक्शन हे ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून ते लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक महत्त्वाचे स्थानक आहे. वसई रोड ते दिवा आणि दिवा ते पनवेल हे दोन महत्त्वाचे जोडमार्ग दिव्यामध्ये जुळतात. ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वे मार्गे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.