पश्चिम मार्गावरील लोकल जलद व धीम्या गतीच्या असून चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंत सेवा पुरवली जाते. जलद लोकल केवळ निवडक स्थानकांवर तर धीम्या लोकल सर्व स्थानकांवर थांबतात. अनेक वर्षे चर्चगेट ते विरार दरम्यान सेवा पुरवणाऱ्या पश्चिम मार्गाची सेवा १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू रोडपर्यंत वाढवण्यात आली. चर्चगेटपासून धावणाऱ्या लोकल विरारपर्यंत जलद व धिमी दोन्ही गतीने धावतात व पुढे डहाणू रोडपर्यंत धीम्या गतीने सर्व स्थानकावर थांबतात.