ग्रँट रोड हे मुंबई शहराचे एक उपनगर व दक्षिण मुंबईमधील एक वर्दळीचा रस्ता आहे. ह्या भागाचे नाव मुंबईचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँटच्या गौरवार्थ ठेवले गेले. ग्रँट रोड रेल्वे स्थानक मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे. मौलाना शौकत अली रोड हे या रस्त्याचे नवे न वापरले जाणारे नाव आहे.
पाकिस्तानातील लाहोर शहरातही मौलाना शौकत ाली रोड आहे.
जवळचे भाग
- ऑगस्ट क्रांती मैदान (प्रचलित जुने नाव - गोवालिया टॅंक).
- जवळच्याच लॅमिंग्टन रोड वर इलेक्ट्रॉनिक्स व संगणकाच्या सुट्या भागांची घाऊक आणि किरकोळ दुकाने आहेत. लॅमिंग्टन रोडचे वापरात नसलेले नवे नाव डाॅ. ए.नायर रोड आहे.