लोअर परळ हे मुंबई शहराच्या परळ भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. लोअर परळ स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्यापश्चिम मार्गावर स्थित आहे. या भागात १९८० च्या दशकापर्यंत अनेक कापडाच्या गिरण्या होत्या. त्या बंद पडल्यावर तेथे आता अलिशान गगनचुंबी इमारतींची रचना झाली आहे. यात महागडी घरे, दुकाने, हॉटेल आणि पब आहेत.