कल्याण जंक्शन हे कल्याण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. कल्याण येथे मुंबई उपनगरी रेल्वेचा मध्य मार्ग दोन शाखांमध्ये विभागतो. ईशान्य शाखा कसाऱ्यामार्गे मनमाडकडे तर आग्नेय शाखा कर्जतमार्गे पुण्याकडे धावते. मुंबई उपनगरी सेवेमधील कल्याण तिसरे सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.