साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक

साईनगर शिर्डी
शिर्डी
मध्य रेल्वे स्थानक
२०१३मध्ये स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता शिर्डी, महाराष्ट्र ४२३ १०९
गुणक 19°46′16″N 74°28′57″E / 19.7712°N 74.4824°E / 19.7712; 74.4824
समुद्रसपाटीपासूनची उंची ५०४ मी
मार्ग पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
उद्घाटन २००९
विद्युतीकरण हो
संकेत SNSI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग सोलापूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
साईनगर शिर्डी is located in महाराष्ट्र
साईनगर शिर्डी
साईनगर शिर्डी
महाराष्ट्रमधील स्थान
पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्ग
मनमाडकडे
दौंडकडे
पुणतांबेMainline rail interchange
साईनगर शिर्डी Airport interchange

साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी गावात असलेले हे स्थानक साईबाबा या संतांच्या समाधीपासून ५ किमी वर आहे. येथून दक्षिण भारतातील अनेक शहरांना थेट रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

सुविधा

२००९मध्ये बांधल्या गेलेल्या या स्थानकात प्रवाशांना आपल्या गाडीची वाट पाहण्यासाठी दोन छोटी प्रतीक्षागृहे आहेत. येथे स्वच्छतागृहांची कमतरता आहे. स्थानकात खाण्यापीण्याच्या ताज्या वस्तू विकणारी दुकाने नाहीत.

येथून साईबाबा मंदिरापर्यंत फुकट बससेवा आहे.

गाड्या

  1. २२१४७ दादर-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस (शनिवारी) व्हाया मनमाड
  2. १७२०७ विजयवाडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेस सिकंदराबाद मार्गे (बुधवारी)
  3. १७००१ सिकंदराबाद–साईनगर शिर्डी एक्सप्रेस बीदर मार्गे (सोमवार, शनिवार)
  4. १७२०५ काकिनाडा पोर्ट-साईनगर शिर्डी एक्सप्रेस सिकंदराबाद मार्गे (रविवार, मंगळवार, गुरुवार)
  5. ५१०३४ मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी जलद पॅसेंजर दौंड मार्गे
  6. २२६०२ चेन्नई सेंट्रल–साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस येलहंका, दौंड मार्गे (शुक्रवार)
  7. २२८९३ हावडा-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस नागपूर मार्गे (शनिवार)
  8. १८५०४ विशाखापट्टणम–साईनगर शिर्डी एक्सप्रेस काझीपेट मार्गे (शुक्रवार)
  9. १२१३२ दादर-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस व्हाया मनमाड (रविवार, मंगळवार, गुरुवार)
  10. १६२१८ मैसूरु–साईनगर शिर्डी एक्सप्रेस बंगळूर, दौंड मार्गे (मंगळवार)
  11. २२४५५ कालका–साईनगर शिर्डी एक्सप्रेस भोपाळ, आग्रा, नवी दिल्ली मार्गे (मंगळवार, शनिवार)
  12. १८४०८ पुरी–साईनगर शिर्डी एक्सप्रेस मनमाड, नागपूर, रायपूर, भुबनेश्वर मार्गे (रविवार)
  13. १७४१८तिरुपती–साईनगर शिर्डी एक्सप्रेस मनमाड, सिकंदराबाद मार्गे
  14. ११००१ पंढरपूर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस
  15. ११००१ जालना-साईनगर शिर्डी डेमू

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!