भारतीय रेल्वेची दर दिवशी धावणारी रेल्वेगाडी आहे. महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे ते उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीर मधील थंड हवेची राजधानी असणाऱ्या जम्मू तावी पर्यंत धावते. पुणे येथील भारताच्या मुख्य दक्षिण लष्करी तळांच्या डावपेचाच्या दृस्टीने ही ट्रेन सीमा भाग जोडण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
इतिहास
ही झेलम एक्सप्रेस सन 1977 मध्ये सुरू झाली. मुळातच ही अतिशय जुनी ट्रेन आहे. पुणे येथून निघून भारताच्या नवी दिल्ली या राजधानी शहराला जोडणारी भारतातील पहिली ट्रेन आहे. प्रारंभी ही ट्रेन लष्करासाठी चालू झाली.
ट्रेन नंबर आणि ट्रेनचे नाव
जम्मू आणि काश्मीर राज्यातील सुप्रशिद्ध झेलम नदीचे नाव या ट्रेनला दिले. पुणे ते जम्मूतावी या Up ट्रेनचा क्रं. 11077 आणि जम्मु तावी ते पुणे या DOWN ट्रेनचा क्रं. 11078 आहे.
झेलम एक्सप्रेस ही ट्रेन पुणे येथून निघाल्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ऊत्तर प्रदेश, राजस्थांनचा काही भाग, हरयाणा, दिल्ली उत्तर मध्ये रेल्वे, पंजाब, आणि जम्मू आणि काश्मीर असी 2177 किमीप्रवास 40 तासात करते. या प्रवासादरम्यान तीची उरळी, दौंड, अहमदनगर, बेलापुर, कोपरगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बुरहाणपूर, खांडवा, छानेरा, हरदा, टीमरणी, बाणापुरा, इटारसी, होसांगाबाद, हबिबगंज, भोपाळ, विदिशा,गंजबसोडा, बिना, ललितपुर, बाबींना, झांसी, दाटीय, डबरा, ग्वालियर, मॉरेना, धौलपूर, आगरा कन्टानमेंट, राजा-की-मंडी, मथुरा, फरीदाबाद, हजरत निजमूद्दीन, नवी दिल्ली, सुबजी मंडी, नरेला, सोनिपत, गनौर, पानीपत, करणाळ, तरओरी, कुरुक्षेत्र, अंबाला कोण्टोंमेंट, अंबाला सिटी, राजपुरा, सिरिन्द,खन्ना, लुधीयाणा, फगावारा, जालंधर, तंडा उरमर, दासूया, मुकेरियन, चक्की बँक, कथूया, संबा, विजयपूर जम्मू, ही स्थानके आणि अंतिम जम्मू तावी येथून परत वळते.[२]
पुढील काळातील दृष्टीकोण
दौंड –मनमाड आणि जालन्धर- पठाणकोट- जम्मू तावी या विभागात दोन पदरी रूळ आणि विध्यूतीकरण झाले की जम्मू तावी ट्रेनचा वेग आत्ताच्या वेगपेक्षा नक्कीच वाढेल शिवाय जम्मू तावी – उधमपुर-कातरा हा विभाग पूर्ण झाला की ही ट्रेन कातरा पर्यंत जाईल असी आश्या आहे.[३].