दौंड जंक्शन हे पुणे जिल्ह्याच्या दौंड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या दौंडमधून मनमाडकडे जाणारा फाटा फुटतो. ह्यामुळे पुण्याहून उत्तर व दक्षिणेकडील प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या गाड्या दौंडमधूनच धावतात. पुणे उपनगरी रेल्वे सेवा दौंडपर्यंत चालवण्याची मागणी गेले अनेक वर्षे स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.
रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या
दौंड कॉर्ड लाईन रेल्वेस्थानक (DDCC)
पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणा-या गाड्यांसाठी २०२० मध्ये हे रेल्वेस्थानक बांधण्यात आले आहे. या स्थानकाच्या निर्मितीपूर्वी पुण्याहून मनमाडकडे जाणा-या गाड्यांना दौंड जंक्शनमध्ये इंजिनची दिशा बदलण्यासाठी (सोलापूरकडून मनमाडकडे) ३० ते ४५ मिनिटे वेळ लागत असे. हा वेळ वाचवण्यासाठी पुणे - दौंड रेल्वेलाईन आणि दौंड - मनमाड रेल्वेलाईन यांना जोडणारी एक बायपास रेल्वेलाईन तयार करण्यात आली. आता पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणा-या गाड्या दौंड जंक्शनमध्ये न जाता थेट या बायपास रेल्वेलाईनवर बांधण्यात आलेल्या नवीन रेल्वे स्थानकामध्ये येतात आणि फक्त २-३ मिनिटे थांबून पुढे मार्गस्थ होतात.
दौंड जंक्शनपासून दौंड कॉर्ड लाईन रेल्वेस्थानक हे ३ किमी अंतरावर आहे.दोन्ही रेल्वे स्थानकांदरम्यान रिक्षासेवा उपलब्ध आहे.
बाह्य दुवे