साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग WARNING: template omitted, post-expand include size too large -->
भुसावळ रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या भुसावळमार्गे जातात. याशिवाय येथून जळगाव मार्गे सुरतकडे जाणारा रेल्वेमार्ग मुख्य मार्गांना जोडतो.
इतिहास
भारतातील पहिला रेल्वेमार्ग १८५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[१][२] भुसावळ रेल्वे स्थानक १८६० मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६९ साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[३]
संदर्भ