आमगाव हे भारत देशाच्या गोंदिया जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले आमगाव रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते. हे नागपूर स्थानकापासून सुमारे १४८ किमी अंतरावर आहे, तर गोंदिया स्थानकापासून हावड्याकडे सुमारे २२ किमी अंतरावर आहे. येथे ३ फलाट आहेत. या स्थानकावर सुमारे २७ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही रेल्वे गाडीची सुरुवात होत नाही व कोणतीही गाडी येथे टर्मिनेट होत नाही.[१]
आमगाव रेल्वे स्थानकाहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या