भारताने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. भारताने वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच व्हाइटवॉश दिला. ट्वेंटी२० मालिकेत पहिला सामना भारताने जिंकला. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून वेस्ट इंडीजने पुनरागमन केले. त्रिनिदादहून भारतीय खेळाडूंचे सामान बासेतेरला पोचण्यास उशीर झाल्याने दुसरा ट्वेंटी२० सामना तब्बल तीन तासांच्या विलंबाने सुरू झाला. भारताने शेवटचे तीन्ही सामने जिंकले आणि ट्वेंटी२० मालिकेमध्ये ४-१ अश्या फरकाने विजय नोंदवला.