बल्गेरिया क्रिकेट संघाचा सर्बिया दौरा, २०२२
सर्बिया
बल्गेरिया
तारीख
८ – १० जुलै २०२२
संघनायक
रॉबिन विटास
प्रकाश मिश्रा
२०-२० मालिका
निकाल
सर्बिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा
सिमो इवेटिक (१४९)
ओमर रसूल (१६०)
सर्वाधिक बळी
ॲलिस्टेर गॅजिक (७)
ह्रिस्तो लाकोव (४)
बल्गेरिया क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सर्बियाचा दौरा केला. जूनमध्ये सर्बियाने बल्गेरियाचा दौरा केल्यानंतर बल्गेरियाने दौऱ्याची परतफेड म्हणून सर्बियाचा दौरा केला. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली. तसेच सर्बियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट सामने खेळविण्यात आले.
सर्बियाने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकाविजय निश्चित केला. सर्बियाने बल्गेरियाविरुद्ध पहिल्यांदाच ट्वेंटी२० मालिका जिंकली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात बल्गेरियाने ९५ धावांनी विजय मिळवला. सर्बियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
वि
प्रकाश मिश्रा ५५ (३२) ॲलिस्टेर गॅजिक ३/२६ (३ षटके)
सिमो इवेटिक ६५* (५७) प्रकाश मिश्रा १/१८ (४ षटके)
सर्बिया ७ गडी राखून विजयी. लिसीजी जियाराक मैदान , बेलग्रेड पंच: ड्रॅगन जोकिच (स) आणि इव्हान दिमित्रोव्ह (ब) सामनावीर: अयो मीन-एजिगे (सर्बिया)
नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.
सर्बियामध्ये खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
बल्गेरियाने सर्बियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सर्बियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बल्गेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ॲलिस्टेर गॅजिक, मार्क पाव्हलोविक, सिमो इवेटिक (स) आणि तरुण यादव (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
वि
ओमर रसूल ६१ (४०) ॲलिस्टेर गॅजिक ४/१२ (४ षटके)
सिमो इवेटिक ६१* (४४) प्रकाश मिश्रा १/२४ (४ षटके)
सर्बिया ८ गडी राखून विजयी. लिसीजी जियाराक मैदान , बेलग्रेड पंच: ड्रॅगन जोकिच (स) आणि इव्हान दिमित्रोव्ह (ब) सामनावीर: विंट्ले बर्टन (सर्बिया)
नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
वि
ओमर रसूल ९९* (५६) मातिजा सॅरेनाक १/१७ (३ षटके)
सिमो इवेटिक २३ (११) ह्रिस्तो लाकोव ३/२१ (४ षटके)
नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.
सचिन शिंदे (स) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
मे २०२२ जून २०२२ जुलै २०२२ चालु स्पर्धा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे सर्बिया दौरे
संपूर्ण सदस्यांचे दौरे
संपूर्ण सदस्यांच्या स्पर्धांचे आयोजन
अनेक संघ -
असोसिएट संघांचे दौरे
बल्गेरिया असोसिएट संघांची स्पर्धा