झिम्बाब्वेने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. नामिबियाने दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले. पुन्हा झिम्बाब्वेने तिसरा सामना जिंकून आघाडी घेतली. ४थ्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत नामिबियाने विजय मिळवून मालिका २-२ अश्या स्थितीत आणून ठेवली. मालिकेतील पाचव्या आणि निर्णायक लढतीत नामिबियाने झिम्बाब्वेला ३२ धावांनी पराभूत करत ऐतिहासिक मालिकाविजय मिळवला. नामिबियाने पहिल्यांदाच कसोटी देशाला द्विपक्षीय मालिकेत पराभूत केले.