भारतीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९९२ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. एप्रिल १९९२ च्या आयसीसी सर्वसाधारण सभेत आयसीसीने झिम्बाब्वेला संपूर्ण सदस्याचा दर्जा देत अधिकृत कसोटी सामने खेळण्याची अनुमती दिली. झिम्बाब्वेने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. डेव्हिड हॉटनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाने एकमेव कसोटी अनिर्णित राखली. पदार्पणाच्या कसोटीत पराभव टाळणारा झिम्बाब्वे पहिला वहिला देश ठरला. एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारताने ३० धावांनी जिंकला.
झिम्बाब्वेच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी सामना खेळवला गेला. भारताने झिम्बाब्वेमध्ये पहिली कसोटी खेळली तसेच झिम्बाब्वेचा देखील मायभूमीवरील पहिला कसोटी सामना.
झिम्बाब्वे आणि भारत या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.