यजमान मलेशियासहबहरैन, भूतान, हाँग काँग, कुवेत, नेपाळ, ओमान, कतार, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या दहा देशांनी स्पर्धेत भाग घेतला. १० संघांना पाचच्या दोन गटात ठेवण्यात आले. गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. आणि उपांत्य सामन्यांचे विजेते थेट आशिया चषकास पात्र ठरले. तरीसुद्धा स्पर्धेचा विजेता ठरविण्यासाठी उपांत्य सामन्यांच्या विजेत्यांमध्ये जेतेपदासाठी अंतिम सामना खेळविण्यात आला. उपांत्य फेरीतून मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती अंतिम सामन्यासाठी आणि परिणामतः २०२२ महिला आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने मलेशियाचा ५ गडी राखून पराभव करत अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
संयुक्त अरब अमिराती महिला १० गडी राखून विजयी. किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि नारायणन सिवन (म) सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
नाणेफेक :संयुक्त अरब अमिराती महिला, क्षेत्ररक्षण.
सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
संयुक्त अरब अमिरातीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
रिया भसिन (सिं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
मलेशिया महिला १० गडी राखून विजयी. युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी पंच: आनंद नटराजन (सिं) आणि दुर्गा सुवेदी (ने) सामनावीर: विनीफ्रेड दुराईसिंगम (मलेशिया)
नाणेफेक :मलेशिया महिला, क्षेत्ररक्षण.
मलेशिया आणि कतार या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
कतारने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
मलेशियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये कतारवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
संयुक्त अरब अमिराती महिला ३१ धावांनी विजयी. युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी पंच: आनंद नटराजन (सिं) आणि सारिका प्रसाद (सिं) सामनावीर: इंदुजा नंदकुमार (संयुक्त अरब अमिराती)
संयुक्त अरब अमिराती महिला १५३ धावांनी विजयी. किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर पंच: समद अकबर (था) आणि दुर्गा सुवेदी (ने) सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
नाणेफेक :संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
संचिन सिंग (सं.अ.अ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
संयुक्त अरब अमिराती महिला ५ गडी राखून विजयी. किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर पंच: आनंद नटराजन (सिं) आणि दुर्गा सुवेदी (ने) सामनावीर: तीर्था सतीश (संयुक्त अरब अमिराती)