दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना , तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२२ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. दक्षिण आफ्रिका महिला संघाने २०१४ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. कसोटी सामन्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड अ संघासोबत तीन-दिवसीय सराव सामना खेळला.
एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने एकूण ४ नवोदित खेळाडूंना संधी दिली तर दक्षिण आफ्रिकेच्या एकूण ९ खेळाडूंनी महिला कसोटीत पदार्पण केले. प्रथम फलंदाजी करताना मेरिझॅन कॅप हिच्या १५० धावांच्या साथीने २८४ धावा केल्या. महिला कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना मेरिझॅनने केलेल्या १५० धावा या सर्वाधिक धावा होत्या, इंग्लंडने देखील नॅटली सायव्हर आणि ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स या दोघींच्या शतकांमुळे ४१७ धावा केल्या. चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात १८१ धावांवर असताना पावसाचा व्यत्यत आल्याने सामना अनिर्णित सुटला. इंग्लंडने महिला वनडे आणि ट्वेंटी२० मालिका दोन्ही अनुक्रमे ३-० आणि ३-० या फरकाने जिंकल्या.
सराव सामने
दोन-दिवसीय सामना:इंग्लंड अ महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला
वि
३२५/९घो (८९ षटके)
अँड्री स्टाइन ६३ (११४) ग्रेस पॉट्स ३/४१ (११ षटके)
नाणेफेक: दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
२० षटकांचा सामना:इंग्लंड अ महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला
नाणेफेक : इंग्लंड अ महिला, फलंदाजी.
५० षटकांचा सामना:इंग्लंड अ महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला
इंग्लंड अ महिला ७ गडी राखून विजयी. ग्रेस रोड , लेस्टर पंच: साराह बार्लेट (इं) आणि सोफी मॅकलेलॅंड (इं)
नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.
महिला कसोटी मालिका
एकमेव महिला कसोटी
नाणेफेक: इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
लॉरेन बेल , ॲलिस-डेव्हिडसन रिचर्डस , एमा लॅम्ब , इसी वाँग (इं), ॲनेके बॉश , नादिने डी क्लर्क , लारा गुडल , सिनालो जाफ्ता , सुने लूस , नॉनकुलुलेको म्लाबा , तुमी सेखुखुने , अँड्री स्टाइन आणि लॉरा वॉल्व्हार्ड (द.आ.) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - २.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका - ०.
२रा सामना
नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
लॉरेन बेल आणि इसी वाँग (इं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका - ०.
३रा सामना
नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
इसी वाँग (इं) आणि डेल्मी टकर (द.आ.) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.
२रा सामना
नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
ॲलिस कॅप्सी (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.
३रा सामना
नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
फ्रेया केंप (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.
मे २०२२ जून २०२२ जुलै २०२२ चालु स्पर्धा