पोर्ट ऑफ स्पेन, अधिकृतपणे पोर्ट ऑफ स्पेन ही त्रिनिदाद आणि टोबॅगोची राजधानी आहे. विस्तार तुलनेत सॅनफर्नांडो नंतर दुसऱ्या क्रमांकावर आणि चागुआनास नंतर तिसरी सर्वात मोठी महानरपालिका आहे. शहराची महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 37,074 (2011 जनगणनेनुसार), शहरी लोकसंख्या 81,142 (2011 जनगणनेनुसार) आणि क्षणिक लोकसंख्या 250,000 इतकी आहे. शहराचा विस्तार त्रिनिदाद बेटाच्या वायव्य दिशा किनाऱ्यापासून पॅरीयाच्या आखातापर्यंत आणि पश्चिमेकडे चागुआरामास पासून पूर्वेकडे अरिमा पर्यंत पसरलेल्या द्वीपसमुहाचा भाग आहे.
हे शहर प्रामुख्याने किरकोळ आणि प्रशासकीय केंद्र म्हणून काम करते आणि १७५७ पासून या बेटाच्या राजधानीचे शहर आहे. तसेच कॅरिबियन साठीचे एक महत्त्वपूर्ण आर्थिक सेवा केंद्र असून या प्रदेशातील दोन सर्वात मोठया बँकांचे घर आहे.