दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९१-९२

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९१-९२
वेस्ट इंडीज
दक्षिण आफ्रिका
तारीख ७ – २३ एप्रिल १९९२
संघनायक रिची रिचर्डसन केप्लर वेसल्स
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने एप्रिल १९९२ दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. एकदिवसीय मालिका देखील वेस्ट इंडीजने ३-० ने जिंकली.

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यामधील ही पहिली द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका होती. दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन झाल्यानंतरचा हा पहिला कसोटी सामना होता. याआधी दक्षिण आफ्रिकेने तब्बल २१ वर्षांपूर्वी ५ मार्च १९७० रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकी संघ बहिष्कार होण्याच्या आधी केवळ श्वेतवर्णीय देशांच्या बरोबरच क्रिकेट खेळायचा. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा हा वेस्ट इंडीज दौरा खऱ्या अर्थाने वर्णभेदाच्या मुद्द्याला कठोर उत्तर होते.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

७ एप्रिल १९९२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२८७/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८० (४२.२ षटके)
फिल सिमन्स १२२ (११३)
ॲड्रायन कुइपर ३/३३ (५ षटके)
वेस्ट इंडीज १०७ धावांनी विजयी.
सबिना पार्क, किंग्स्टन
सामनावीर: फिल सिमन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • कोरी व्हान झिल (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

११ एप्रिल १९९२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१५२ (४३.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५४/० (२५.५ षटके)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

१२ एप्रिल १९९२
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१८९/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९०/३ (४३ षटके)
केपलर वेसल्स ४५ (७७)
रॉजर हार्पर २/३१ (१० षटके)
फिल सिमन्स १०४ (१३९)
मेरिक प्रिंगल १/६ (५ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: फिल सिमन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

कसोटी मालिका

एकमेव कसोटी

१८-२३ एप्रिल १९९२
धावफलक
वि
२६२ (७१.४ षटके)
कीथ आर्थरटन ५९ (९७)
रिचर्ड स्नेल ४/८३ (१८ षटके)
३४५ (१३५.५ षटके)
अँड्रु हडसन १६३ (३८४)
जिमी ॲडम्स ४/४३ (२१.५ षटके)
२८३ (८१.३ षटके)
जिमी ॲडम्स ७९* (१६९)
रिचर्ड स्नेल ४/७४ (१६ षटके)
१४८ (७२.४ षटके)
केपलर वेसल्स ७४ (१७४)
कर्टली ॲम्ब्रोज ६/३४ (२४.४ षटके)
वेस्ट इंडीज ५२ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: कर्टली ॲम्ब्रोज (वेस्ट इंडीज) आणि अँड्रु हडसन (दक्षिण आफ्रिका)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!