भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता.[ १] [ २] [ ३] या दौऱ्यावर चार आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले गेले.[ ४] [ ५] जून २०२४ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या दोघांनीही या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[ ६] [ ७]
संघ
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला आं.टी२० सामना
भारत २०२/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
अँडील सिमेलेनने दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सलग दोन शतके ठोकणारा संजू सॅमसन हा पहिला भारतीय फलंदाज ठरला.[ १०]
२रा आं.टी२० सामना
भारत १२४/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
भारताच्या वरूण चक्रवर्तीने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिले पाच बळी घेतले.[ ११]
३रा आं.टी२० सामना
भारत २१९/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
रमणदीप सिंगने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
भारताच्या तिलक वर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले.[ १२]
वरुण चक्रवर्ती हा आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमध्ये १० बळी घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला.[ १३]
४था आं.टी२० सामना
भारत २८३/१ (२० षटके)
वि
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संजू सॅमसन आणि तिलक वर्मा (भा) ही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकाच डावात शतके ठोकणारी पूर्ण सदस्य राष्ट्रांची पहिली जोडी ठरली.[ १४]
संजू सॅमसन आणि टिळक वर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये मध्ये दुसऱ्या गड्यासाठी नाबाद २१० धावांची सर्वोच्च भागीदारी नोंदवली.[ १५]
संजू सॅमसन एका कॅलेंडर वर्षात तीन शतके ठोकणारा T20I क्रिकेटमधला पहिला फलंदाज ठरला.[ १६]
भारताने दोन पूर्ण सदस्य संघांमध्ये एका आंतरराष्ट्रीय टी२० डावात सर्वाधिक षटकार (२३) नोंदवले.[ १७]
तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सलग दोन शतके ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.[ १८]
नोंदी
^ फक्त तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी संघात.
संदर्भयादी
^ "South Africa announce T20I series at home against India" [दक्षिण आफ्रिकेकडून भारताविरुद्ध मायदेशातील आंतरराष्ट्रीय टी२० मालिका जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "India to tour South Africa for short T20I series in November" [भारत नोव्हेंबरमध्ये छोट्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार]. क्रिकबझ्झ . २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Team India to tour South Africa for 4 T20Is right after home Test series against New Zealand, dates announced" [न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार, तारखा जाहीर]. हिंदुस्तान टाइम्स . २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "India to tour South Africa for four T20Is in November 2024" [नोव्हेंबर २०२४ मध्ये भारत चार आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो . २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "India set to tour South Africa in November to play 4-match T20I series" [४ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळण्यासाठी भारत नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यास सज्ज]. द इंडियन एक्सप्रेस . २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "BCCI-CSA announce schedule of South Africa-India T20I series" [बीसीसीआय-सीएसएने दक्षिण आफ्रिका-भारत आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ . २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "CSA and BCCI announce upcoming series" [सीएसए आणि बीसीसीआयकडून आगामी मालिकेची घोषणा]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका . २१ जून २०२४. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "South Africa announce squad for home T20I series against India" [दक्षिण आफ्रिकेकडून भारताविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ६ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Squads for India's tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced" [भारताचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आणि बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ . २५ ऑक्टोबर २०२४.
^ "Sanju Samson first Indian to smash back-to-back T20I centuries" [संजू सॅमसन आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये लागोपाठ शतके ठोकणारा पहिला भारतीय]. हिंदुस्तान टाइम्स . ८ नोव्हेंबर २०२४. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Varun Chakravarthy Bags this Huge Record with His Five Wicket Haul Against South Africa" [वरुण चक्रवर्तीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विक्रम, सामन्यात ५ बळी"]. द टाइम्स ऑफ इंडिया . ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "IND vs SA: Tilak Varma scores maiden T20I century for India vs South Africa" [भारत वि दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिकेविरुध्द भारताकडून टिळक वर्माचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक]. स्पोर्टस्टार . चेन्नई. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Varun Chakravarthy Creates History, Becomes 1st Indian Bowler To..." [वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास, बनला पहिला भारतीय गोलंदाज...]. न्यूज१८ . १५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "IND vs SA: Samson, Tilak become first pair from full member nations to score centuries in one innings" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: सॅमसन, टिळक ही एकाच डावात शतके ठोकणारी पूर्ण सदस्य राष्ट्रांची पहिली जोडी]. स्पोर्टस्टार . Chennai. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Sanju Samson, Tilak Varma break plethora of records in 4th T20I" [संजू सॅमसन, टिळक वर्मा यांनी चौथ्या टी२० मध्ये अनेक विक्रम मोडले]. हिंदुस्थान टाइम्स . १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "India vs South Africa Live Score, 4th T20I: Sanju Samson's Historic Ton, Tilak Varma Century Power India To 283/1" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका थेट धावफलक, चौथा आंतरराष्ट्रीय टी२० सामना: संजू सॅमसनचे ऐतिहासिक शतक, तिलक वर्माच्या शतकामुळे भारत २८३/१]. एनडीटीव्ही स्पोर्ट्स . १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "Samson, Tilak smash records like it's nobody's business to hand India 3-1 series win" [सॅमसन, तिलकने विक्रम असे मोडीत काढले की भारताला ३-१ ने मालिका जिंकणे हे कोणाचेच काम नाही]. ESPNcricinfo . १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "IND vs SA: Tilak Varma becomes second Indian to score consecutive T20I centuries" [भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: तिलक वर्मा सलग आंतरराष्ट्रीय टी२० शतके करणारा दुसरा भारतीय ठरला]. स्पोर्टस्टार . १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले .
बाह्यदुवे
दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरे
कसोटी आणि मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय दौरे
ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड भारत केनिया न्यूझीलंड पाकिस्तान श्रीलंका वेस्ट इंडीज झिम्बाब्वे स्पर्धा आयोजित केल्या
अनेक संघ इतर दौरे
नोंद: १९७० आणि १९९१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वेगळे करताना, विविध संघांनी सात अनधिकृत दौरे (खाली तिर्यक केलेले ) होते, ज्यांना एकत्रितपणे दक्षिण आफ्रिकेचे बंडखोर दौरे म्हणून ओळखले जाते.
ऑस्ट्रेलियन बांगलादेशी डच इंग्लिश आयरिश केनिया बहुराष्ट्रीय नामिबियन स्कॉटिश श्रीलंका वेस्ट इंडियन
सप्टेंबर २०२४ ऑक्टोबर २०२४ नोव्हेंबर २०२४ डिसेंबर २०२४ जानेवारी २०२५ फेब्रुवारी २०२५ मार्च २०२५ चालू मालिका