इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८८८-८९
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख
१२ – २६ मार्च १८८९
संघनायक
ओवेन डनेल (१ली कसोटी) विल्यम मिल्टन (२री कसोटी)
ऑब्रे स्मिथ (१ली कसोटी) माँटी बाउडेन (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल
इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १८८९ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने या दौऱ्यात कसोटी पदार्पण केले. इंग्लंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना हा दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेलेला पहिलाच प्रथम-श्रेणी सामना होता. या आधी या देशात कधीही प्रथम-श्रेणी सामना खेळवला गेला नव्हता.
कसोटी मालिका
१ली कसोटी
नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना.
ओवेन डनेल , चार्ल्स फिनलासन , फिलिप हचिन्सन , गुस्ताव केम्पिस , विल्यम मिल्टन , आर्थर एडवर्ड ऑक्से , अल्बर्ट रोझ-इनेस , फ्रेडरिक स्मिथ , रॉबर्ट स्टुअर्ट , बर्नार्ड टॅंक्रेड , चार्ल्स व्हिंट्सेंट (द.आ.), बेसिल ग्रीव्ह , माँटी बाउडेन , फ्रँक हर्न , ऑब्रे स्मिथ , चार्ली कोव्हेन्ट्री आणि आर्नोल्ड फॉदरगिल (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
या मैदानावरचा पहिला कसोटी सामना .
२री कसोटी