ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळले.[१][२] एकदिवसीय सामने हे २०२३ च्या पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनले.[३]
मुळात, हा दौरा मार्च २०२१ मध्ये होणार होता[४][५] आणि तीन कसोटी सामने खेळवले जाणार होते.[६] ते सामने २०१९-२०२१ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग बनले असते.[७] तथापि, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे तो दौरा फेब्रुवारी २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आला.[८]