न्यू झीलंड क्रिकेट संघाने १९ ते ३१ ऑगस्ट २०१६ दरम्यान २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला [१] कोपराला झालेल्या दुखापतीमुळे ए.बी. डी व्हिलियर्स ऐवजी फाफ डू प्लेसीने कर्णधार पदाची धूरा सांभाळली.[२]
डर्बन येथील पहिली कसोटी ही दक्षिण आफ्रिकेची उन्हाळ्यात सर्वात लवकर खेळवली गेलेली कसोटी होती. याआधी दक्षिण आफ्रिकेमध्ये सप्टेंबरमध्ये सुद्धा कसोटी खेळवली गेली नव्हती. याआधी सर्वात लवकर सुरू झालेली कसोटी, १९०२-०३ च्या मोसमात जोहान्सबर्गमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ ऑक्टोबर १९०२ रोजी सुरू झाली होती.[३]
पहिली कसोटी पावसामुळे वाया गेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी २०४ धावांनी जिंकून मालिकेत १-० असा विजय मिळवला. हा न्यू झीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सलग पाचवा मालिका विजय.[४]
संघ
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे १ल्या दिवशी सामना लवकर थांबवण्यात आला.
- २ऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला.
- ३, ४ व ५व्या दिवशी ओल्या मैदानामुळे खेळ होऊ शकला नाही.
२री कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी.
- हाशिम आमलाच्या (द) न्यू झीलंडविरूद्ध १००० कसोटी धावा पूर्ण.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
|
---|
|
जानेवारी २०१६ | |
---|
फेब्रुवारी २०१६ | |
---|
मार्च २०१६ | |
---|
एप्रिल २०१६ | |
---|
मे २०१६ | |
---|
जून २०१६ | |
---|
जुलै २०१६ | |
---|
ऑगस्ट २०१६ | |
---|
सप्टेंबर २०१६ | |
---|
|