२०२२-२३ दक्षिण आफ्रिका महिला तिरंगी मालिका ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत २०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पूर्वतयारी मालिका म्हणून खेळविली गेली.[१][२] ही भारतीय महिला, दक्षिण आफ्रिका महिला आणि वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ यांच्यातील एक त्रिदेशीय मालिका होती, ज्यामध्ये महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० (WT20I) सामने खेळवले गेले. [३] डिसेंबर २०२२ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सर्व सामने पूर्व लंडनमधील बफेलो पार्क येथे खेळवल्या जाणाऱ्या मालिकेसाठी निश्चित केले.[४]
साखळी स्टेजच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून १० गडी राखून पराभूत झाल्यानंतर वेस्ट इंडीज संघ स्पर्धेतून बाद झाला.[५] अंतिम सामन्यात क्लोई ट्रायॉनच्या नाबाद अर्धशतकामुळे यजमानांना भारतावर ५ गडी राखून विजय मिळवता आला.[६]
स्पर्धेपूर्वी, चेरी-ॲन फ्रेझर फ्रेझरला दुखापतीमुळे बाहेर काढण्यात आले आणि तिच्या जागी शनिका ब्रुसला संघात स्थान देण्यात आले.[१०] वेस्ट इंडीजने टूर्नामेंटच्या त्यांच्या अंतिम सामन्यासाठी दुखापतींच्या बदली म्हणून ट्रिशन होल्डर, झैदा जेम्स, जेनाबा जोसेफ आणि जेनिलिया ग्लासगोयांना संघात समाविष्ट केले.[११] सर्व चार खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच संपलेल्या २०२३ आयसीसी १९-वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता.[१२]
भारताने २७ धावांनी विजय मिळवला बफेलो पार्क, पूर्व लंडन पंच: लॉरेन एजेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि थॉमस मोकोरोसी (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: अमनजोत कौर (भारत)
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अमनजोत कौर (भारत) ने तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.
दक्षिण आफ्रिकेचा ४४ धावांनी विजय झाला बफेलो पार्क, पूर्व लंडन पंच: रायन हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका) आणि फिलिप वोस्लू (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: मसाबता क्लास (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारताने ५६ धावांनी विजय मिळवला बफेलो पार्क, पूर्व लंडन पंच: लॉरेन एजेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि फिलिप वोस्लू (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: स्मृती मानधना (भारत)
दक्षिण आफ्रिकेने १० गडी राखून विजय मिळवला बफेलो पार्क, पूर्व लंडन पंच: रयान हेंड्रिक्स (दक्षिण अफ्रीका) और थॉमस मोकोरोसी (दक्षिण अफ्रीका) सामनावीर: तजमिन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका)
वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अॅनेरी डेर्कसेन (दक्षिण आफ्रिका) हिने महिला टी२०आ पदार्पण केले.
भारताने ८ गडी राखून विजय मिळवला बफेलो पार्क, पूर्व लंडन पंच: थॉमस मोकोरोसी (दक्षिण आफ्रिका) आणि फिलिप वोस्लू (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)
भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
जॅनिलिया ग्लासगो आणि झैदा जेम्स (वेस्ट इंडीज) या दोघांनीही महिला टी२०आ पदार्पण केले.
दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला बफेलो पार्क, पूर्व लंडन पंच: लॉरेन एजेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि थॉमस मोकोरोसी (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: क्लो ट्रायॉन (दक्षिण आफ्रिका)