नोव्हेंबर २०२१ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी)चे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन, ऑक्टोबर २०२१ मध्ये इंग्लंडचा पाकिस्तानचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर इसीबी आणि पीसीबी यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानला गेले.[७] सकारात्मक चर्चेनंतर, पाच टी२० सामन्यांचा मूळ दौरा सात सामन्यांचा करण्यात आला.[८] आधी टी२० सामने खेळवले जातील,[९] तर ऑस्ट्रेलियातील २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकनंतर कसोटी सामने खेळवले जातील.[१०] एप्रिल २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मालिका होणार असण्याची पुष्टी केली.[११][१२] जुलै २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेरमन रमीझ राजा यांनी सांगितले की टी२० सामने लाहोर आणि कराचीमध्ये होण्याची शक्यता आहे.[१३] टी२० मालिकेचे तपशील २ ऑगस्ट २०२२ रोजी निश्चित करण्यात आले.[१४][१५][१६] कसोटी मालिकेचा कार्यक्रम नंतर २२ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर करण्यात आला.[१७][१८]
टी२० मालिकेतील कराचीमधील सामन्यांत मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती दिसली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, कराचीतील पहिल्या चार सामन्यांना १,२६,५५० लोक उपस्थित होते.[१९]
१६ डिसेंबर २०२२ रोजी, पाकिस्तानच्या अझहर अलीने कसोटी मालिका पूर्ण झाल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.[२०]
इसीबी ने जाहीर केले की जोस बटलर पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे टी२० मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे, त्याच्याजागी मोईन अलीकडे कर्णधारपद देण्यात आले.[२३]ॲलेक्स हेल्सला नंतर टी२०संघात समाविष्ट करण्यात आले.[२४]
शान मसूद (पा) आणि ल्यूक वूड (इं) दोघांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
मोहम्मद रिझवान (पा) हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये कमीत कमी डावांमध्ये (५२) सर्वात वेगवान २,००० धावा करणारा चौथा पाकिस्तानी खेळाडू ठरला त्याने ह्याबाबतीत बाबर आझमशी बरोबरी केली .[२५]
झॅक क्रॉली चे शतक हे इंग्लिश सलामीवीराचे चेंडूंच्या बाबतीत सर्वात वेगवान कसोटी शतक होते (८६).[३०]
चार इंग्लिश खेळाडूंनी पहिल्या दिवशी शतके ठोकली, कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक शतके.[३१]
इंग्लंडने पहिल्या दिवशी ५०६ धावा केल्या, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केलेल्या सर्वाधिक धावा.[३१]
संघांच्या एकत्रित १,७६८ धावा ह्या ५ दिवसांच्या कसोटी सामन्यातील सर्वोच्च एकूण धावा होत्या, ज्याने मागील २४-२९ जानेवारी १९६९ या कालावधीत वेस्ट इंडीजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ॲडलेड कसोटीमधील १,७६४ धावांचा विक्रम मागे टाकला. .[३२]
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, पाकिस्तान ०.
पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात इंग्लंडने १८० धावा केल्या, कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात केलेल्या सर्वाधिक धावा.[३३]
अबरार अहमद कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात पाच बळी घेणारा पहिला पाकिस्तानी गोलंदाज ठरला.[३३] कसोटी पदार्पणात पाच बळी घेणारा तो तेरावा पाकिस्तानी गोलंदाज ठरला.[३४]
अबरार अहमद पहिल्याच कसोटी सामन्यात दहा बळी घेणारा दुसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला.[३५]
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, पाकिस्तान ०.