ॲलिस कॅप्सीला पहिल्या एकदिवसीय सामान्यदरम्यान गळपट्टीचे हाड तुटल्यामुळे उर्वरित दौऱ्यातून बाहेर पडावे लागले आले.[७] त्यामुळे मैया बुशिए आणि ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स यांचा इंग्लडच्या टी२० संघात समावेश करण्यात आला.[८] तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी किशोना नाइटचा दुखापतग्रस्त करिष्मा रामहॅराकच्या जागी वेस्ट इंडीजच्या संघात समावेश कारणात आला.[९] टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी, फ्रेया केम्पला पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या संघाबाहेर जावे लागले.[१०] नंतर असे जाहीर करण्यात आले की केम्पला तिच्या पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आहे, ज्यामुळे तिला 2023 ICC महिला T20 विश्वचषक मधून सुद्धा बाहेर पडावे लागले.[११]