२०२३ आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक हा २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेद्वारे आयोजित आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पहिली आवृत्ती सध्या चालू आहे.[१][२] एप्रिल २०२१ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) ने घोषणा केली की कोविड-१९ महामारीमुळे ही स्पर्धा २०२१ च्या शेवटी त्याच्या मूळ वेळापत्रकावरून जानेवारी २०२३ पर्यंत हलवण्यात आली आहे.[३][४]
पार्श्वभूमी
मूलतः, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे डिसेंबर २०२१ मध्ये हलवण्यापूर्वी ही स्पर्धा जानेवारी २०२१ मध्ये होणार होती[५][६] नोव्हेंबर २०२० मध्ये, आयसीसीने जानेवारी २०२१ च्या नियोजित वेळापत्रकावरून वर्षाच्या उत्तरार्धात स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यतेची चपापणी केली.[७] जानेवारी २०२१ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली की ते डिसेंबर २०२१ मध्ये स्पर्धेचे आयोजन करतील,[८] तथापि ही स्पर्धा दुसऱ्यांदा पुढे ढकलून जानेवारी २०२३ मध्ये हलवण्यात आली.[९] जानेवारी २०२२ मध्ये, आयसीसीचे सीईओ, जेफ ऑलार्डीस यांनी सांगितले की ही स्पर्धा होणारच होती आणि आयसीसी यजमानांसाठी प्रक्रिया सुरू करत आहे.[१०]
पात्रता
जून २०२२ मध्ये, आयसीसीने स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेची पुष्टी केली.[११] यजमान दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यू झीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या सर्व देशांनी स्पर्धेसाठी आपोआप पात्रता मिळवली.[१२] अमेरिकेनेदेखील आपोआप पात्र ठरले, कारण ते अमेरिका प्रादेशिक गटातून स्पर्धा करण्यासाठी एकमेव पात्र संघ होते.[१३] उर्वरित चार देश प्रादेशिक पात्रता गटातून पात्र ठरले.[११] आशिया पात्रता जिंकल्यानंतर संयुक्त अरब अमिराती हा प्रादेशिक गटांमधून पात्र ठरणारा पहिला संघ होता.[१४] इंडोनेशियाने त्यांची पापुआ न्यू गिनी विरुद्धची तीन सामन्यांची मालिका जिंकून पूर्व आशिया-प्रशांत गट जिंकून पात्रता प्राप्त केली.[१५] इंडोनेशियासाठी कोणत्याही स्तरावर आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ होती.[१६] रवांडाने आफ्रिकन पात्रता जिंकून विश्वचषकासाठी पात्र ठरले. रवांडा प्रथमच आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी कोणत्याही स्तरावर पात्र ठरला होता.[१७] स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड स्टेट्स आणि झिम्बाब्वे यांच्यासाठीसुद्धा कोणत्याही स्तरावरील हा पहिला आयसीसी महिला विश्वचषक आहे.
स्पर्धेचे स्वरूप
पथके
सामना अधिकारी
स्थळे
सराव सामने
गट फेरी
चौथ्या स्थानावरील प्ले-ऑफ
सुपर ६
बाद फेरी
संदर्भयादी
बाह्य दुवे
|
---|
|
सप्टेंबर २०२२ | |
---|
ऑक्टोबर २०२२ | |
---|
नोव्हेंबर २०२२ | |
---|
डिसेंबर २०२२ | |
---|
जानेवारी २०२३ | |
---|
फेब्रुवारी २०२३ | |
---|
मार्च २०२३ | |
---|
एप्रिल २०२३ | |
---|
चालू स्पर्धा | |
---|
|