स्कॉटलंड (स्कॉटिश गेलिक भाषेत नाव अल्बा) हा वायव्य युरोपातील एक देश आहे. हा देश युनायटेड किंग्डमच्या चार घटक राष्ट्रांपैकी एक आहे.
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
स्कॉटलंड या नावाचा सगळ्यात जुना उल्लेख इ.स.च्या दहाव्या शतकातील अँग्लो-सॅक्सन बखरीवजा पुस्तकात सापडतो. हा शब्द लॅटिन भाषेतील स्कॉटी यावरून आल्याचे समजले जाते. स्कॉटी हा शब्द गेल वंशीय लोकांसाठी वापरला जात असे. त्यावरून लॅटिनमध्ये स्कॉटिया (गेल वंशीयांची भूमी) हा शब्द वापरला जाऊ लागला. स्कॉटियाचे पुढे स्कॉटलंड झाले.
मध्ययुगीन दंतकथेप्रमाणे स्कॉटलंडचे नाव इजिप्तच्या स्कॉटा या राजकुमारीच्या नावावरून आले आहे. या दंतकथेत स्कॉटाला गेल वंशीय प्रजेची आद्य माता समजले आहे.
प्रागैतिहासिक कालखंड
स्कॉटलंडमध्ये आदिमानव इसवी सन पूर्व ११,००० वर्षांच्यापूर्वी आला असे मानले जाते. वायकिंगस ही उत्तर युरोपातील एक लुटारू जमात दक्षिण स्कॉटलंडमध्ये स्थायिक झाली.स्कॉटलंड हा कालांतराने रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला.
अर्वाचीन कालखंड
पहिला डंकन हा इसवी सन १०३४ मध्ये स्कॉटलंडचा पहिला राजा बनला.स्कॉटलंडचे स्कॉटिश गेलिक भाषेमधील नाव एल्बा असे आहे.मॅकबेथने पहिल्या डंकनचा पराभव केला आणि तो राजा बनला. स्कॉटलंडचे राज्य एल्बाचे राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले.मे १, इ.स. १७०७ पर्यंत स्कॉटलंड एक सार्वभौम देश होता. या दिवशी झालेल्या युतीने तो युनायटेड किंग्डमचा घटक देश बनला.
भूगोल
चतुःसीमा
स्कॉटलंड ग्रेट ब्रिटनच्या बेटाच्या उत्तर भागात आहे. याच्या दक्षिणेला इंग्लंड, उत्तर व पश्चिमेस अटलांटिक महासागर व पूर्वेस उत्तर समुद्र आहेत.
स्कॉटलंडमधील केवळ ४ स्थानांना शहराचा दर्जा आहे. ग्लासगो हे स्कॉटलंडचे सगळ्यात मोठे शहर आहे.स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग हे युरोपमधील एक मोठे आर्थिक केंद्र आहे.
क्रम-शहर-लोकसंख्या
१-ग्लासगो-५,८१,३२०
२-एडिनबर्ग-४,५४,२८०
३-अॅबर्डीन-१,८३,०३०
४-डंडी-१,४२,०७०
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
धर्म
चर्च ऑफ स्कॉटलंड हे स्कॉटलंडमधील सगळ्यात मोठे व राष्ट्रीय चर्च आहे. या चर्चचा उल्लेख द कर्क असाही केला जातो. पश्चिम स्कॉटलंडमध्ये कॅथोलिकपंथीय वस्ती आहे.
शिक्षण
स्कॉटिश शिक्षणव्यवस्था युनायटेड किंग्डममधील व्यवस्थेपेक्षा निराळी आहे. येथे विस्तृत शिक्षणावर भर दिला जातो.
तीन व चार वर्षाच्या बालकांना शिक्षण फुकट असते.
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
स्कॉटलंडमध्ये विपुल प्रमाणात खनिज तेल आढळून येते.