बांगलादेश क्रिकेट संघ ऑगस्ट २०२४ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता.[ १] [ २] [ ३] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेचा भाग होती.[ ४] [ ५] पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२३-२०२७ आयसीसी भविष्य दौरे कार्यक्रमाचा भाग म्हणून द्विपक्षीय मालिका आयोजित केली होती.[ ६] जुलै २०२४ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीचे सामने जाहीर केले होते.[ ७] [ ८]
१८ ऑगस्ट २०२४ रोजी, पीसीबीने बांधकामामुळे दुसरा कसोटी सामना नॅशनल स्टेडियम , कराची येथून रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये हलवला.[ ९]
संघ
१७ ऑगस्ट २०२४ रोजी, महमुदुल हसन जॉय मांडीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला.[ १२] [ १३] १९ ऑगस्ट २०२४ रोजी, आमेर जमाल पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला.[ १४]
कसोटी मालिका
पहिली कसोटी
बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दिवसाची सुरुवात ओल्या आउटफिल्डमुळे ४ तास ३० मिनिटे उशीराने झाली.
सौद शकील (पाकिस्तान) यांनी कसोटीत १००० धावा पूर्ण केल्या.[ १५]
बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानची ही सर्वात कमी धावसंख्या होती.[ १६]
बांगलादेशचा कसोटी मध्ये पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय होता.[ १७]
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश १२, पाकिस्तान ०.
दुसरी कसोटी
३० ऑगस्ट–२ सप्टेंबर २०२४
धावफलक
बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
खुर्रम शहजादने (पा) कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[ १८]
हसन महमूदचे (बां) कसोटीमध्ये पहिले पाच बळी घेतले.[ १९]
प्रथमच, बांगलादेशी वेगवान गोलंदाजांनी कसोटीत एका डावातील सर्व १० विकेट्स घेतल्या.[ २०] [ २१]
बांगलादेशने पाकिस्तानच्या भूमीत कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश १२, पाकिस्तान ०.
संदर्भ
बाह्य दुवे
पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरे
कसोटी आणि मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय दौरे
ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड भारत न्यू झीलंड दक्षिण आफ्रिका श्रीलंका वेस्ट इंडीज झिम्बाब्वे स्पर्धा आयोजित केल्या
अनेक संघ इतर दौरे
अफगाण बांगलादेशी सिलोन/श्रीलंकन इंग्रजी बहुराष्ट्रीय २००९ पासून संयुक्त अरब अमिराती किंवा इतर तटस्थ ठिकाणी खेळल्या गेलेल्या मालिका इटालिक मध्ये दर्शवले आहेत.
एप्रिल २०२४ मे २०२४ जून २०२४ जुलै २०२४ ऑगस्ट २०२४ सप्टेंबर २०२४ चालू आहे