तुर्कस्तानचे नाव, तुर्की भाषेमध्ये Türkiye (तुर्किए) यावचे दोन अर्थ होऊ शकतात: १. 'तुर्क' याचा अर्थ जुन्या तुर्की भाषेमधे शक्तिशाली असा होतो. २. तुर्कस्तानच्या नावाची फोड तुर्कि-एन आहे. त्याचा अर्थ : तुर्की म्हणजे तुर्की लोक, एन म्हणजे त्यांच्या मालकीचे आहे असा होतो. यावरून तुर्कस्तानला हे नाव पडले असावे.
२००८ च्या गणनेनुसार तुर्कस्तानची वस्ती ७ कोटी १५ लाख इतकी होती. याचा वृद्धीदर वार्षिक १.३१% इतका आहे. येथील लोकसंख्या घनता ९२ व्यक्ती प्रती किमी२ आहे. ७०.५% तुर्कस्तानी शहरांतून राहतात. तुर्कस्तानचे ६६.५% नागरिक १५-६४ वर्षे वयोगटात मोडतात तर २६.४% व्यक्ती ०-१४ वर्षे वयोगटात आहेत. ७.१% व्यक्ती ६५ किंवा अधिक वयाच्या आहेत.[२][३]
धर्म
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
पर्यटन
गेल्या काही वर्षात तुर्कस्तान पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे. देशाला लाभलेला प्राचीन इतिहास व त्याच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळे या देशात आहेत. इस्तंबूल शहराला सर्वात जास्त पर्यटक भेट देतात. प्राचीन ग्रीक-रोमन, सुरुवातीचे ख्रिस्ती समाज, बायझंटाईन ख्रिस्ती, ऑटोमन इस्लामी व आधुनिक कमाल अतातुर्क यांचा नवा आधुनिक तुर्की यांची सरमिसळ झालेली संस्कृती येथे पहावयास मिळते. तसेच अत्यंत वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक भौगोलिक प्रेक्षणीय स्थळेही या देशात आहेत. वैविध्यपूर्ण भूमध्यसमुद्रीय हवामानामुळे युरोपातील असंख्य पर्यटकांना तुर्कस्तानचे आकर्षण असते.
इस्तंबूल हे सर्वाधिक पर्यटकांचे भेट देण्याचे शहर आहे. इस्तंबूल शहर हे प्राचीन कॉन्स्टॅंटिनोपल या नावाने ओळखले जाई व या शहराला दोन हजार वर्षांपेक्षा जास्ती इतिहास लाभलेला आहे. हे शहर १००० वर्षे बायझंटाईन साम्राज्याची राजधानी व नंतर ऑटोमन साम्राज्याची राजधानी होते. त्यामुळे बायझंटाईन व इस्लामी स्थापत्याची सरमिसळ येथे दिसून येते. अय्यासोफिया, निळी मशीद, शाही बाझार व टोपकापीचा राजवाडा ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
तुर्कस्तानचा पश्चिम किनारा हा प्राचीन काळी प्रामुख्याने ग्रीक अधिपत्याखाली होता. त्यामुळे अनेक प्राचीन ग्रीक शहरे या किनाऱ्यालगत आहेत. ट्रॉयच्या लढाईमुळे इतिहासात अजरामर झालेल्या ट्रॉय शहराच्या खाणाखुणा आजही दिसतात. पुरातत्त्व खात्याने शोधलेली अनेक शहरे आज पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनली आहेत. कुसादासी शहराजवळील प्राचीन इफेसूस हे प्राचीन शहर हे सर्वात मोठे आकर्षण आहे. प्राचीन जगतातील एक आश्चर्य आर्टेमिसच्या देवळाचे भग्नावशेष या शहराजवळ पहायला मिळतात. इफेसूसचे प्राचीन शहर हे सेल्सुजच्या ग्रंथालयासाठी व प्रचंड मोठ्या ग्रीक थिएटरसाठी तसेच येशू ख्रिस्ताच्या आईच्या उत्तर आयुष्यातील निवासस्थानासाठी प्रसिद्ध आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम किनाऱ्यावरील इतर प्रसिद्ध स्थळांमध्ये पेरॉगमन, डिडिमा, अंतल्या इत्यादी प्रसिद्ध स्थळे आहेत.
अंकारा ही देशाची राजधानी पर्यटनाच्या दृष्टीने फारशी प्रसिद्ध नाही, परंतु मध्य व पूर्व तुर्कस्तानमधील स्थळांकडे जाण्यास येथूनच जावे लागते. त्यामुळे पर्यटक येथे भेट देतात. कमाल अतातुर्क यांनी एका छोट्या शहराला राजधानी बनवून त्याचे महत्त्व वाढवले.
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!