श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८४
|
|
|
इंग्लंड
|
श्रीलंका
|
तारीख
|
२३ – २८ ऑगस्ट १९८४
|
संघनायक
|
डेव्हिड गोवर
|
दुलिप मेंडीस
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
१-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
|
श्रीलंका क्रिकेट संघाने ऑगस्ट १९८४ दरम्यान एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. हा श्रीलंकेचा पहिला इंग्लंड दौरा होता. याआधी दोन्ही संघ श्रीलंकेच्याच पहिल्या कसोटी साठी मार्च १९८२ मध्ये एकमेकांशी कसोटी खेळले होते. एकमेव कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर झाला जो की अनिर्णित सुटला. पाहुण्या श्रीलंकेचे नेतृत्व दुलिप मेंडीसने केले.
इंग्लंडने मायदेशात सन १९३२ नंतर प्रथमच एकमेव कसोटी सामना असलेली द्विपक्षीय मालिका खेळली.
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंडमध्ये श्रीलंकेचा पहिला कसोटी सामना.
- अरविंद डि सिल्व्हा (श्री) याने कसोटी पदार्पण केले.