पाकिस्तान क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडच्या भूमीवर पाकिस्तानने प्रथमच एकदिवसीय मालिका खेळली. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने २-० असा विजय संपादन केला. इंग्लंडने मायदेशात पहिल्यांदा एकदिवसीय मालिका हरली.