न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९८३ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ही मालिका जून मध्ये पार पडलेल्या १९८३ क्रिकेट विश्वचषक संपल्यानंतर खेळविण्यात आली. मालिकेतील दुसरी कसोटी जिंकत न्यू झीलंडने इंग्लंडमध्ये पहिला कसोटी विजय संपादन केला. कसोटी मालिका इंग्लंडने ४-१ ने जिंकली.