१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका ही एक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये मे-ऑगस्ट १९१२ दरम्यान झाली. तत्कालिन ३ कसोटी देश अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी १९०९ मध्ये एकत्र येत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची स्थापना केली. त्यावेळी झालेल्या ठरावात दर चार वर्षांनी कसोटी तिरंगी मालिका भरविण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला. १९१२ मध्ये प्रथम इंग्लंडमध्ये ही स्पर्धा भरवली गेली. परंतु, आर्थिक पाठबळ न मिळाल्यामुळे पुन्हा ही स्पर्धा कधीच भरवण्यात आली नाही. इ.स. २०१९ मध्ये म्हणजेच १०७ वर्षानंतर आयसीसीने कसोटी विश्वचषकाची घोषणा केली.
तीन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध ३ कसोटी सामने खेळले. इंग्लंडने गुणफलकात अव्वल स्थान मिळवत स्पर्धा आपल्या नावावर केली. या मालिकेतील ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मधील सामने हे ॲशेस अंतर्गत देखील धरण्यात आले.
गुणफलक
कसोटी तिरंगी मालिका सामने
१ली कसोटी
२री कसोटी
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- क्लॉड कार्टर (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
४थी कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
५वी कसोटी
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- एडगर मेन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
६वी कसोटी
७वी कसोटी
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
८वी कसोटी
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
९वी कसोटी