बांगलादेश क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. वेळापत्रकानुसार हा दौरा ऑक्टोबर २०२० मध्येच होणार होता परंतु त्यावेळेस कोरोनाव्हायरस ह्या साथीच्या रोगाच्या संक्रमणामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता. २९ सप्टेंबर २०२० रोजी न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने दौरा मार्च २०२१ मध्ये होईल असे जाहीर केले. दुसऱ्या दिवशी वेळापत्रक जाहीर केले गेले. ट्वेंटी२० सामने हे न्यू झीलंड महिला संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी२० सामन्यांबरोबरच त्याच मैदानात काही तासांच्या अंतराने होणार आहेत. एकदिवसीय मालिका ही २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली.
एकदिवसीय मालिकेआधी दुखापत झाल्याने न्यू झीलंडचा नियमीत कर्णधार केन विल्यमसन हा एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. त्याच्याजागी टॉम लॅथमकडे न्यू झीलंडचे कर्णधारपद देण्यात आले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-० ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील न्यू झीलंडने ३-० ने जिंकली.