ऑस्ट्रेलियाने पहिला महिला ट्वेंटी२० सामना सहा गडी राखून जिंकला तर न्यू झीलंडने दुसरा सामना चार गडी राखून जिंकूत मालिका बरोबरीत आणली. तिसरा सामना हा पावसामुळे २.५ षटकांनंतर रद्द करण्यात आल्याने तीन सामन्यांची महिला ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकत ऑस्ट्रेलिया महिलांनी सलग २२ एकदिवसीय सामने जिंकण्याच्या विक्रम केला. २००२-०३ दरम्यानच्या रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात पुरुष संघाच्या २१ अपराजित एकदिवसीय सामन्यांचा विक्रम ऑस्ट्रेलिया महिलांनी मोडला. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.
पावसामुळे प्रथमत: सामना प्रत्येकी १३-१३ षटकांचा करण्यात आला. परंतु ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान परत आलेल्या पावसामुळे सामना २.५ षटकांनंतर रद्द करण्यात आला.