भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९७६-७७
भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९७७ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा केला. ज्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघांबरोबर एक-एक कसोटी सामना भारतीय महिलांनी खेळला.
न्यू झीलंड महिला वि भारत महिला
भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९७६-७७
भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यू झीलंडविरुद्ध ८-११ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो अनिर्णित सुटला. भारतीय महिलांनी प्रथमच न्यू झीलंडच्या भूमीवर आणि विदेशात महिला कसोटी सामना खेळला.
ऑस्ट्रेलिया महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५-१७ जानेवारी १९७७ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळला जो ऑस्ट्रेलिया महिलांनी १८७ धावांनी जिंकला. भारतीय महिलांनी प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर महिला कसोटी सामना खेळला.