श्रीलंका क्रिकेट संघाने मार्च १९८३ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. श्रीलंकेचा हा पहिला न्यू झीलंड दौरा होता. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने अनुक्रमे २-० आणि ३-० अश्या जिंकल्या. न्यू झीलंड दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियात श्रीलंकेने दोन प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले.